बदलापूर ! आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे व शिवसेना शहर प्रमुख ,वामन म्हात्रे यांच्या सहकार्याने बदलापूर रेल्वे बाबात आमरण उपोषण कर्ते यांची DMR सोबत बैठक संपन्न

*बदलापूर, दि. 27/2/2026 रोजी संयुक्त भारत पक्ष आणि बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गेल्या पाच-सहा दिवसांपासून बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेले आमरण उपोषणाची दखल घेऊन आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी विधीमंडळामध्ये आवाज उठवला होता व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याशी रेल्वे प्रवाशांच्या समस्या उपोषणा संदर्भात चर्चा केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व खासदार श्रीकांत शिंदे यांनी DMR यांना फोनवरून सूचना दिल्या की आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे , आमदार अंबरनाथ श्री. बालाजी किणीकर आणि उपोषण करते आपल्याला भेटतील, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन तात्काळ मार्ग काढा, असे फोनवरून सांगितले

*त्यानुसार उपोषण करते व बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत रेल्वे प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन घेतले*
*या आंदोलनात प्रामुख्याने सुरक्षा आणि सुवीधांशी संबंधित मागण्यांचा समावेश होता. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी झालेल्या रेल्वे अपघातात चेतना देवरे, तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आंदोलकांची प्रमुख मागणी होती की, त्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई देऊन द्यावी. नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे.*
*यासह बदलापूर स्थानकावर स्वच्छतागृहे बांधणी करणे व नियमित ते स्वच्छ ठेवणे , पिण्याच्या पाण्याची सोय, फलाटांवर छत बांधकाम, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, कल्याण स्थानकावर लोकल अनावश्यक थांबवल्याने होणारा विलंब होणे , बदलापूर-सीएसएमटी दरम्यान १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवणे, लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि कर्जत-कसारा दरम्यान मेल/एक्सप्रेस तसेच मालगाड्यांसाठी वेगळ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करणे अशा मागण्यांचा समावेश केला होता.
रेल्वे प्रवास करताना डब्यामध्ये सुरक्षा वाढवणे, चिखलोली स्टेशनचे काम लवकरच पूर्ण करून घेणे, अंबरनाथ पर्यंत येऊन थांबणाऱ्या गाड्या बदलापूर पर्यंत आणणे, स्वयंचलित जिने 24 तास चालू ठेवणे, आणि स्वतः डी आर एम एल यांनी फलाटावरच्या सर्व व्यवस्थांची पाहणी तात्काळ करावी अशी मागणी केली,

बैठकीचे आयोजन : –
*आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री. हिरेश मीना साहेब यांच्या* *अध्यक्षतेखाली बदलापूर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाकडून वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक (कार्य) श्री. प्रकाश कनोजिया हे उपस्थित होते. ही बैठक यशस्वी* *होण्यासाठी माननीय आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर आमदार श्री. बालाजी किणीकर साहेब आणि शिवसेना शहर प्रमुख श्री. वामनदादा म्हात्रे, ठाणे उपजिल्हाप्रमुख श्री संजय जाधव बदलापूर संपर्कप्रमुख श्री संजय भोईर, उपशहर प्रमुख श्री अनंत जावळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

*या बैठकीला संयुक्त भारत पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक बहादरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सिद्धांत शिरसाट, उपोषणकर्ते व महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. अनिल काळणे (उपोषणकर्ते), विधी सल्लागार अँड. गणेश मसुरकर, अँड. स्वप्निल मोटे, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. उदय स्वामी, ठाणे जिल्हाध्यक्षा महिला नंदा राऊत, ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश आढाव, ठाणे जिल्हा सचिव डॉ. श्रीनिवास नवाथे, अंबरनाथ तालुकाध्यक्षा महिला ज्योती शिरसाट, बदलापूर शहराध्यक्ष श्री. सुरेश शिंदे, बदलापूर शहराध्यक्षा महिला सुवर्णा इसवलकर यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रेल्वे अधिकारी श्री अजित मशाळकर साहेब यांचे खूप मोलाचं सहकार्य लाभले.




