महाराष्ट्र

पोलिस महासंचालक म्हणून महाराष्ट्र राज्याचा कारभार आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी श्री सदानंद दाते स्विकारणार,,,

३१ डिसेंबर २०२५ पासुन कार्यभाग स्विकारणार

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी श्री सदानंद दाते हे कार्यभाग स्विकारणार आहेत, विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत आला असल्याने,येत्या ३१ डिसेंबर पासून श्री सदानंद दाते हे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत,

या पदासाठी महाराष्ट्र शासनाकडून श्री सदानंद दाते, महासंचालक एन आय ए, श्री संजय वर्मा डि जी पी (कायदा व तंत्रज्ञान), श्री रितेश कुमार कमांडर जनरल होमगार्ड, श्री संजिव कुमार सिंघल डिजिपी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,आर्चना त्यागी महासंचालक राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, तसेच नागरी सुरक्षा महासंचालक व इतर वरीष्ठ अधिकारी यांची नावे युपीएससी कडे पाठवण्यात आली होती , या मध्ये १९९० च्या बॅचचे कर्तव्यदक्ष अधिकारी सदानंद दाते यांची शासनाकडून महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून निवड केली आहे, सदानंद दाते हे शिस्तप्रिय आणि प्रामाणिक आणि धाडसी व्यक्ती म्हणून ओळखले जातात, त्यांनी आपल्या सेवा काळात रेल्वे पोलिस नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सायबर गुन्हे, अर्थिक गुन्हे शाखा या मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणा महासंचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत,
मुंबई मध्ये २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली आहे,कामा रुग्णालयात घुसलेल्या दोन दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना दोन गोळ्या लागल्या होत्या, त्यांनी दाखवलेल्या शौर्या मुळे अनेक नागरीकांचे प्राण वाचले आहेत, राष्ट्रीय तपास यंत्रणेची धुरा सांभाळत असताना त्यांनी अशा अनेक दहशतवादी कारवाया ऊधळुन लावल्या आहेत,
असा कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्र राज्याचा महासंचालक म्हणून काम पाहणार असल्याने राज्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!