शैक्षणीक

जिल्हा परिषद कांदळी शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

विश्वरत्न महामानव संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कांदळी, भिवंडी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व ग्रामपंचायत सदस्य अनंता जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले*.

उपस्थित विद्यार्थी, पालक व शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी पुष्प अर्पण करून महामानवास अभिवादन केले.

सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अभिवादन पर मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी अभिवादन पर मनोगते व्यक्त केली.

सदर अभिवादन कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी, सदस्या प्रतीक्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्य अनंता जाधव, क्लर्क धनश्री बेलवले, शिपाई प्रकाश जाधव, पालक स्वरा तारमळे, अंगणवाडीताई कविता जाधव, मदतनीस गोदावरी जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!