क्राइम

बदलापूर! निरजा आंबेरकर खुन प्रकरणातील आरोपी गजाआड,, बदलापूर पुर्व पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,,

पति रुपेश आंबेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्पदंश घडवून केली निरजा आंबेरकर यांची हत्या

सुमारे तीन वर्षां पूर्वी पतिनेच त्याच्या मित्रांच्या मदतीने काही अज्ञात कारणावरून पत्नीचा खुन केला असल्याची घटना बदलापूर पुर्व पोलिसांनी शिताफीने उघडकीस आणली आहे,कुळगाव बदलापूर शहरातील “एक घास आपुलकिचा “या संस्थेच्या अध्यक्षा तसेच महिला कॉग्रेस पदाधिकारी निरजा आंबेरकर त्यांचे पती रुपेश आंबेरकर आणि त्यांचे सहकारी पिकनिक करुन परत येत असताना निरजा आंबेरकर यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती,निरजा आंबेरकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे त्यांचे पती रुपेश आंबेरकर यांनी सांगितले होते,त्या अनुषंगाने पोलिसांनी नैसर्गिक अकस्मित मृत्यू ५३/२२ नोंद केली होती, परंतु या बाबत बदलापूर पुर्व पोलिसांना मिळालेल्या संशयित गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरूच ठेवला होता

 दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी एका गुन्ह्यात अटक असलेला आरोपी ऋषिकेश चाळके हा देखील घटनेच्या दिवशी रुपेश आंबेरकर याच्या बरोबर असल्याचे समजल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या कबुली जबाबा नुसार बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याचे क्राईम पि आय राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे, पोलिस अधिकारी मयुर गायकवाड, भैरवनाथ शेळके आणि ईतर यांनी केलेल्या तपासात निरजा आंबेरकर यांची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे,

 

ऋषिकेश चाळके याने दिलेल्या कबुली जबाबात रुपेश आंबेरकर याच्या सांगण्यावरून निरजा आंबेरकर यांची सर्पदंश घडवून आणुन हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले आहे, या बाबत क्राईम पि आय राजेश गज्जल आणि त्यांचे सहकारी यांनी तपासाची चक्रे फिरवून ऋषिकेश चाळके याने करुन दाखवलेल्या प्रात्यक्षिकेच्या आधारे निरजा आंबेरकर यांचा पति रुपेश आंबेरकर तसेच चेतन दुधाने, कुणाल चौधरी, ऋषिकेश चाळके यांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरिक्षक अनुकूल दोंदे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३९/२०२५ नुसार हत्येचा गुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे, या खुनाचा कट कल्याण येथील आधारवाडी तुरुंगात शिजला असल्याची माहिती समोर आली आहे,

अंबरनाथ शहरातील एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आक्टोंबर २०२२ मध्ये काही आरोपींना अटक केली होती, न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी चेतन दुधाने, कुणाल चौधरी,, अक्षय जाधव,हरिश घाडगे,दिपक वाघमारे,यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली होती, या वेळी निरजा आंबेरकर यांचा पति रुपेश आंबेरकर हा चेतन दुधाने याला भेटण्यासाठी वारंवार जात होता,याच वेळी रुपेश आंबेरकर याने पत्नी निरजा आंबेरकर हिचा खुन करण्याची सुपारी चेतन दुधाने याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, या चौघांनी निरजा आंबेरकर यांना एका घरात सर्पदंश दिला आणि हा नैसर्गिक मृत्यू असल्याची खोटी माहिती पोलिसांना देण्यात आली होती, परंतु ऋषिकेश चाळके याच्या जबानी वरुन हा कट उधळला गेला आहे,घटनेचा पुढील तपास, क्राईम पि आय राजेश गज्जल करत आहेत, या कामी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल , सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस हवालदार गिरी गोसावी, मयुर गायकवाड, हवालदार म्हसकर, राजपूत ,वरखडे,मिरकले,शिर्के,जगताप , पोलिस हवालदार पाटील, पाटोळे, पालवे,नेमाने भारती त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम करून या घटनेतील आरोपी यांना गजा आड करून मृत निरजा आंबेरकर यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असल्याने संपूर्ण शहरात बदलापूर पुर्व पोलिस प्रशासनाचे विशेष कौतुक केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!