जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा

आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा कांदळी तालुका भिवंडी येथे ७ नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून संपन्न झाला.
*सदर कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला विद्यार्थ्यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
*यावेळी शिक्षक अशोक गायकवाड यांनी 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन का साजरा करण्यात येतो या विषयावर प्रबोधन पर मार्गदर्शन केले.

*विद्यार्थी दिवस या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते (भाषणे ) सादर केली. तसेच विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या*.
*नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं* या गाण्यावर इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले.
सदर कार्यक्रमाला कांदळी गावचे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते




