राजनीति

बदलापूर! प्रभाग क्रमांक ४ मधुन महायुतीच्या उमेदवार भारती राम लिये यांची प्रचारात आघाडी,,,

प्रभाग क्रमांक ४ मधुन मोठ्या मताधिक्याने निवडुन येण्याचा लिये यांना विश्वास

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय युतीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या उमेदवार भारती राम लिये यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राम लिये यांच्या भारती लिये ह्या सुविद्य पत्नी आहेत, राजकीय सामाजिक क्षेत्रात राम लिये यांच्या खांद्याला खांदा लावून भारती लिये यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात आपले बहुमोल योगदान दिले आहे,

फक्त प्रभागातीलच नाही तर शहरातील सर्वांगीण विकासासाठी राम लिये आणि भारती लिये यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत, या मध्ये महिलांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने शहरातील युवती आणि महिलांसाठी उपक्रम राबवत शिलाई मशिन प्रशिक्षण तसेच साहित्य वाटप, विविध शासकीय दाखले वाटप,वृक्षा रोपन, आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिलांसाठी बचत गट,गोर गरीब गरजू लोकांना धान्य वाटप, लाडकी बहिण योजणे बाबतची प्रक्रिया राबवणे, आधार कार्ड सेवा योजना, शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा,कोराना काळात कोरोनाग्रसत नागरिकांना स्वखर्चाने सर्व मदत भारती लिये यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे,

असे अनेक कार्यक्रम शहरातील नागरिकांसाठी राबवत असताना आपल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये रस्ता कॉंक्रिटिकरणा रुंदीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख राहण्यासाठी नळ जोडणी, लाईट व्यवस्था, या बाबत सातत्याने प्रयत्नशील राहुन प्रभागातील नागरिकांना न्याय देण्याचे काम राम लिये आणि भारती लिये यांनी केले असल्याने, प्रभागातील नाही तर शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांना मिळत असल्याने येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय लिये ह्या मोठ्या मताधिक्याने प्रभाग क्रमांक ४ मधुन विजयी होतील अशी चर्चा प्रभागात होत असताना दिसत आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!