बदलापूर – मुरबाड बस एक्सेल तुटल्यामुळे पुन्हा एकदा पडली बंद,,प्रवाशांचे हाल
प्रतिनिधी रुतिकेश रोकडे शुक्रवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५

आज सकाळच्या सुमारास बदलापूर मुरबाड बस मध्ये बसचा एक्सेल तुटल्यामुळे पुन्हा बिघाड झाला. बदलापूर पश्चिम उल्हास नदी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ ही बस पुन्हा एकदा बंद पडली.. घटल्या प्रकारामुळे अनेक प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. बदलापूर मुरबाड रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने बस मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. परंतु या आधी देखील या बसमध्ये अनेक वेळा बिघाड होऊन बस बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी व प्रवाशांनी अनेक वेळा नवीन बस साठी मागणी करून देखील संबंधित प्रशासन सातत्याने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.तसेच बदलापूर मुरबाड बसची अवस्था अत्यंत दैनिय असून लवकरात लवकर उपायोजना केली नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही



