Uncategorized

आदर्शच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा कु. कणाद प्रभुदेसाई या विद्यार्थ्यांची मुंबई विभागातून ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड.

 

महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) या शाळेच्या इयत्ता 9वी मधील कु. कणाद प्रभुदेसाई या विद्यार्थ्याची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा 2025 च्या माध्यमातून ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेमधून 110 विद्यार्थी ISRO अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरले आहेत. मुंबई विभागामधून फक्त दोनच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये आदर्श विद्या मंदिर या शाळेतील कु.कणाद प्रभुदेसाई या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. आदर्श शाळेतील विद्यार्थी क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा विविध स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून यश संपादन करीत आहेत. या यशाचे सर्व श्रेय आदर्श विद्या प्रसारक संस्था, पालक वर्ग, उपमुख्याध्यापिका सौ. जोशी मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती शेरेकर मॅडम, माझे सर्व शिक्षक वृंद यांचे आहे असे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. बुटेरे सर ह्यांचे खूप खूप अभिनंदन व अशाच प्रकारे पुढे देखील संस्थेचे आणि शाळेचे नाव झळकत राहील अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केली.. कणाद यास राम पातकर कुटुंबिया कडून पुढील वाटचालीसाठी  राम व रती पातकर कुटुंबीया कडून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!