महाराष्ट्र

व्यवस्थेने नाकारलेल्या समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज– अण्णासाहेब कटारे

निफाड(प्रतिनिधी):-राष्ट्रीय
रिपब्लिकन पक्षाची जाहीर सभा देवगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सभेस मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली,


या देशातील प्रस्थापित व्यवस्थेने येथील *दलित–आदिवासी– मुस्लिम– अल्पसंख्यांक– भटके विमुक्त– ओ.बी.सी.* घटकांना अजूनही त्यांचे हक्क अधिकार प्राप्त होऊ दिले नाही. आजही त्यांना त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी हेलफाटे मारावे लागतात. नेहमीच आपल्या पदरी निराशा येते ही वस्तुस्थिती आहे. गरीब घटक अजूनही निवाऱ्या पासून वंचित आहे.


*देवगाव येथील अल्पसंख्यांक आदिवासी बांधव* आपल्या हक्कांच्या घरापासून वंचित आहे शासन दरबारी विनंती वारंवार केलेली आहे परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आदिवासी बांधव अत्यंत हलाखीत आपले जीवन व्यथित करत आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मागणी केली की देवगावातील सर्वच आदिवासी बांधवांना त्वरित शासनाने घरकुल उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी अण्णासाहेब कटारे यांनी केली आहे.
*शासनाने योग्य दखल घेऊन घरकुल(जागा) मंजूर न केल्यास राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भव्य आंदोलन करेल*
असे शेवटी कटारे यांनी सांगितले.
*सभेचे आयोजन निफाड तालुका अध्यक्ष भूषण भाई पगारे*
यांनी केले होते.


यावेळी
*भीमश्री विजयराज पगारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष) बिपिन भाई कटारे(युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य),प्रवीण भाई संसारे(युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य),तुषार भाऊ वाघ(येवला युवा नेते),संतोष भाऊ राजगुरू(युवा संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य)महिला आघाडी भारती ताई आढांगळे,युवा नेते प्रशांत कटारे,येवला तालुका उपाध्यक्ष बबन वाघ,प्रसिद्धी प्रमुख वाल्मीक खरात,येवला युवा नेते निलेश शेळके* उपस्थित होते
आभार *गणेश कुडके(निफाड तालुका उपाध्यक्ष*
*स्वप्नील पगारे (निफाड तालुका संपर्कप्रमुख)*
यांनी मानले.


यासभेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे
एकनाथ बर्डे,दत्तू मोरे,राजेंद्र सोनवणे,शिवाजी सोनवणे,सुनील घुते,अशोक पवार,सोमनाथ घुते,कुंदन पवार,नितीन गांगुर्डे,अलका डगळे,मच्छिंद्र इंगळे, दामू पवार,भास्कर सोनवणे,अमोल भवर,अंकुश भवर,अमोल माळी,गुरुनाथ खूरसाने,साईनाथ जिरे,गणेश बंदरे,नाना इंगळे,अजय वटाणे, संतोष माळी आदी उपस्थित होते.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!