शैक्षणीक
विजेता विचार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिक्षक अशोक गायकवाड यांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

विजेता विचार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित दीपावली महोत्सव पिंपळेशेत, भिवंडी येथे दिनांक 19 10 2025 रोजी सायंकाळी संपन्न झाला.
सदर दीपावली महोत्सव कार्यक्रमांतर्गत विजेता विचार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वतीने प्राथमिक शिक्षक अशोक गायकवाड यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना विजेता विचार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वतीने सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा विजेता विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामाकांत नवाळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष गाढे, समता सैनिक दलाचे मार्शल व्हि डी सकपाळे, विजय बाविस्कर, विजेता विचार फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.




