महाराष्ट्र
सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काष्ट्राईब शिक्षक संघटनेच ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन

- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 10.10.2025रोजी काष्ट्राईब शिक्षक संघटना /महासंघाच्या वतीने माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री. माने साहेब यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, महामहीम राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना या हल्लेखोरास कडक शासन व्हावे असे निवेदन सादर करण्यात आले
. याप्रसंगी विजयकुमार जाधव जिल्हाध्यक्ष ठाणे, संतोष गाढे कोकण अध्यक्ष,अशोक गायकवाड राज्य कार्य. सदस्य, विनायक भालेराव केंद्रप्रमुख अध्यक्ष, किशोर भोईर सेवानिवृत्त अध्यक्ष, व्यंकटेश कांबळे नवी मुंबई अध्यक्ष,श्यामकांत नवाळे भिवंडी उपाध्यक्ष, नरेश वाळज संघटक भिवंडी, पूर्णकला नवाळे हे पदाधिकारी उपस्थित होतें




