*पि. एम. श्री शाळा डोहोळे पाडा येथील मुख्याध्यापक अशोक गायकवाड कास्ट्राईब राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

बुधवार दिनांक 1 आॅक्टोबर 2025 रोजी काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 45 वे अधिवेशन जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन नागपूर येथे संपन्न झाले
*काष्ट्राईब कर्मचारी /शिक्षक संघटनेच्या 45 व्या राज्य अधिवेशनात काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणीय सदस्य आयु. अशोक गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळा डोहोळेपाडा तालुका भिवंडी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असतांना शासनाचा प्रधानमंत्री आदर्श शाळा (पि. एम. श्री )अंतर्गत शाळा भौतिक सुविधा, आदर्श परसबाग, सुसज्ज इमारत उभारणी, राज्यघटनेतील मूल्यांचा प्रचार प्रसार होणासाठी राबविलेले विविध उपक्रम, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी व आदिवासी समाज व विद्यार्थी घडविण्याचा केलेला यशस्वी प्रयत्नाचा गौरव काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आयु.माननिय धर्मपाल मेश्राम साहेब उपाध्यक्ष अनु.जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करण्यात आले

यावेळी मुख्यमंत्री सचिवालय नागपूर सहसचिव माननीय आशा पठाण संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब, महासचिव सुरेशजी तांबे, कार्याध्यक्ष बि. डी. धुरंधर, सरचिटणीस सतीश कांबळे, राज्य उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, कोकण अध्यक्ष संतोष गाढे, किशोर भोईर, विनायक भालेराव, लक्ष्मण कांबळे, अरुण हिवरे व राज्यभरातुन आलेल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कास्ट्राईब पदाधिकारी कार्यकर्त्याकडून अशोक गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




