महाराष्ट्र
फलटण येथील डॉ,संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो ( CBI ) मार्फत चौकशी करा _नाना पाटोळे,,

-
फलटण येथील डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो C,B,I, मार्फत चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
महाराष्ट्रातील फलटण तालुक्या जिल्हा सातारा येथील डॉ संपदा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली ही अत्यंत दुर्देवी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे, संपदा मुंडे ह्या अत्यंत कर्तबगार आणि सेवाभावी डॉक्टर होत्या, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टर संघटनांनी गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांना कार्यस्थळावर सतत मानसिक छळ सहन करावा लागत होता, आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, या घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय सेवा वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, अनेक ठिकाणी डॉक्टर संघटनांनी आंदोलन सुरू केले आहेत, प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे, राज्य सरकार कडून प्रारंभीक तपास सुरू झाला असला तरी या प्रकरणी गंभीर आरोप तसेच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता लक्षात घेता, केवळ स्वतंत्र आणि पारदर्शक यंत्रणे मार्फतच सत्य समोर येऊ शकते, म्हणूनच या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBI मार्फत चौकशी व्हावी अशी विनंती नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे,
या चौकशी मुळे मृत डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळेल, तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना पुन्हा विश्वास निर्माण होईल,असा आमचा विश्वास असुन आपण तातडीने या प्रकरणात लक्ष घालून CBI चौकशीचे आदेश द्यावेत असे नाना पटोले यांनी म्हटले आहे,




