Uncategorized

Eclerx and green soul foundation mumbai यांचे तर्फे *जिल्हा परिषद शाळा कांदळी येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, चटई व चप्पल वाटप कार्यक्रम संपन्न

.
आज दिनांक 17 10 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा कांदळी, केंद्र कोशिंबी, तालुका भिवंडी येथे Eclerx and green soul foundation तर्फे शाळेतील व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, चटई व चप्पल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कांदळी गावचे सुपुत्र तसेच शिवसेना ठाणे जिल्हा उपजिल्हाप्रमुख आदरणीय विष्णू दादा चंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.शाळेच्या वतीने आदरणीय विष्णू दादा चंदे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन येथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ठाणे जिल्हा विष्णू दादा चंदे, ग्रीन सोल फाउंडेशन , सोपान ठाकरे समाजसेवक, प्रल्हाद ठाकरे समाजसेवक, अनंता जाधव ग्रामपंचायत सदस्य कांदळी, प्रतीक्षा जाधव, साक्षी जाधव, कविता चंदे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!