धर्म

बदलापूर ! येवला मुक्तीभूमी पर्यटन — श्रद्धावान उपासकांचा प्रेरणादायी प्रवास,,

(रमेशवाडी, बदलापूर पश्चिम) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बस येवला मुक्तीभूमीकडे रवाना झाली.

 

दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी येवला मुक्तीभूमी पर्यटन सहल अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धरीत्या पार पडली. या सहलीत भारतीय बौद्ध महासभा बदलापूर (पूर्व) आणि येथील , सम्राट अशोक नगर येथून पहाटे वंदना करून यात्रेची सुरुवात करण्यात आली.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (रमेशवाडी, बदलापूर पश्चिम) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बस येवला मुक्तीभूमीकडे रवाना झाली.

मार्गात नाश्ता, चहा आणि भोजन याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. येवला मुक्तीभूमी येथे सर्व उपासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या ऐतिहासिक भूमीचे दर्शन घेतले. त्यानंतर नाशिक येथील, बुद्धविहार आणि त्रिरशमी लेणी येथेही पर्यटकांनी भेट देऊन प्रेरणादायी माहिती जाणून घेतली.

या सहलीचे आयोजन सुसंगत व शिस्तबद्ध पार पडावे म्हणून सुभाष खैरनार, रामराव घनघाव, महेंद्र कांबळे यांनी परिश्रम घेतले.


सहल दरम्यान पगारे साहेब आणि प्रकाश उबाळे यांनी पर्यटकांना मनोरंजनासोबतच प्रबोधनही केले. डॉ. दुनबळे सर यांनी लेणी विषयावर सखोल माहिती दिली.

संपूर्ण सहलीदरम्यान वेळेचे काटेकोर पालन, सुयोग्य नियोजन, सूचना देणे, भोजन व्यवस्था आणि पर्यटनातील शिस्तबद्धता राखणे ही जबाबदारी सुभाष खैरनार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

ही सहल श्रद्धावान उपासकांसाठी प्रेरणादायी ठरली असून येवला मुक्तीभूमीच्या पवित्र भूमीवर पुन्हा एकदा जयभीम! नमो बुद्धाय!*चा जयघोष घुमला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!