महाराष्ट्र

बदलापूर ते अक्कलकोट बस सेवा अखेर सुरू,, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या प्रयत्नांना यश,,

"स्वामी समर्थ ", यांच्या दर्शनासाठी अक्कलकोट या ठिकाणी जाण्याचा प्रवास होणार सुलभ

कुळगाव बदलापूर शहर ते अक्कलकोट बस सेवा आज पासून सुरू करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सातत्याने ही बस सेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा केला होता, अखेर अविनाश देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले असून, परिवहन विभाग/मंत्री प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड तसेच राज्य शासनाने या बस सेवे साठी हिरवा कंदील दाखवला आहे,

याच अनुषंगाने कुळगाव बदलापूर पश्चिम बस स्थानकात बदलापूर ते अक्कलकोट बस सेवेचे उद्घाटन परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते करण्यात आले, बदलापूर शहरामध्ये “स्वामी समर्थ “यांना मानणारा मोठा वर्ग असुन, थेट बदलापूर मधुन अक्कलकोट बस सेवा सुरु होऊन स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्याने “स्वामी समर्थ “,यांचे भक्तगण तसेच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे,

सदर बसचा प्रवास हा बदलापूर, विठ्ठलवाडी , कल्याण,पुणा मार्गे अक्कलकोट असा सात तासांचा असणार आहे, रोज संध्याकाळी ६ वाजता बदलापूर पश्चिम बस स्थानकातून ही बस अक्कलकोट कडे रवाना होणार आहे,सातत्याने पाठपुरावा करून ही बससेवा सुरू करण्यासाठी सर्वात मोठे योगदान असलेले अविनाश देशमुख यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, या वेळी या बसचे वाहक यांचा देखील सत्कार आशिष दामले यांच्या हस्ते करण्यात आला, या प्रसंगी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती,

या मध्ये परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, ठाणे जिल्हा कॉग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, अनुसूचित जाती विभाग कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत कारंडे, कॉग्रेस बदलापूर शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष संजय जाधव, कामगार नेते दादासाहेब पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील, रुचिता ताई घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी हेमंत रुमणे,आम आदमी पक्षाचे जिल्हा नेते नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रितम वानखेडे, माणिक कारंडे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!