तरुण तडफदार भीमसैनिक भूषण भाई पगारे यांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे *राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे* यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक येथे निफाड तालुक्यातील तरुण तडफदार आंदोलन मोर्च्यात सदैव अग्रेसर असणारे नेतृत्व *भूषण भाई पगारे* यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

मुखेड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक मोडकळीस आल्याने शासनाने स्मारकाकडे लक्ष द्यावे व स्मारकाची त्वरित दुरुस्ती करावी ह्या मागणी साठी भूषण भाई पगारे यांनी अन्न त्याग आंदोलन देखील केले होते, येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी वारंवार आंदोलने केली आहेत, येवला येथील बसस्थानकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी येवला नाव मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले आहेत,कुठे अन्याय अत्याचार झाल्यास प्रथमता धावून जाणारे असे भीमसैनिक भूषण पगारे.
भूषण पगारे यांच्या निवडीमुळे युवा वर्गामध्ये उत्साह संचारला आहे.

त्यांचे सर्व कार्य पाहता राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी
*भूषण भाई पगारे यांची निफाड तालुका अध्यक्ष पदी निवड जाहीर* करून त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
त्यांचा निफाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे.
भूषण भाई पगारे यांच्या निवडीमुळे तालुक्यात नव्हेच तर नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा येत आहेत व त्यांचे अभिनंदन देखील होत आहे.
लवकरच असंख्य भीमसैनिकांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करणार असल्याचे नवनिर्वाचित निफाड तालुका अध्यक्ष भूषण भाई पगारे यांनी बोलताना सांगितले.
प्रवेशा प्रसंगी
*राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे,राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर सर,युवा नेतृत्व बिपिन कटारे,युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, महिला आघाडी मीनाताई भालेराव, प्रशांत कटारे,युवा नेतृत्व येवला तुषार भाऊ वाघ, नाशिक रोड वैभव पाईकराव, मुंबई नाका संजय वाहुळे,जुना नाशिक शकील शेख,योगेश तांबट*
आदी उपस्थित होते.




