महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहण्यासाठी पडळकर सारख्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी फटकारल पाहिजे _खासदार बाळ्यामामा म्हात्रे

राष्ट्रवादी* काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे तिव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत, गोपीचंद पडळकर यांनी अगदी खालच्या थराला जाऊन केलेल्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात आंदोलन करुन गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला कुत्र्याचे तोंड लावून चपलांचा मार देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला संताप व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे, या बाबत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असुन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे अशा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे , महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहण्यासाठी पडळकर यांच्या सारख्या आमदारांना फटकारण्याची गरज असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हटले आहे



