Uncategorized

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जालना जिल्ह्यात दौरा

अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शहरातील अनेक कुटुंबांचे घरदार, दुकाने व मालमत्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपत्तीग्रस्त भागात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी खासदार कल्याण काळे, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, जालना शहराध्यक्ष आतिक खान आणि छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष युसूफ शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!