लडाख मधील हिंसाचार हा मोदी सरकारला चेतावणी तर नाही ना,,,???

लडाख मध्ये झालेल्या हिसांचार हा मोदी सरकारला एक प्रकारची चेतावणी आहे असे म्हटल तर वावग ठरणार नाही, लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या,हि मागणी स्थानिक नागरिकांकडून गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याने लडाखमधील तरुणांच्या संय्यमाचा बाण फुटला,सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन सुरू केले, परंतु केंद्र सरकारने या आंदोलनाकडे पाठ फिरवली, परिणामी संतप्त तरुणांनी थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला चढवला, आंदोलनाने प्रचंड उग्र रुप धारण केले आंदोलन दडपण्यासाठी सरकारने थेट सैन्यदलाची मदत घेतली, या मध्ये हिंसाचाराला सोनम वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांना गजाआड करण्यात आले,

सोनम वांगचुक हे सोनम वांग्यांल यांचा मुलगा,सन १९६५ मध्ये सोनम वांग्यांल यांनी आपल्या देशाचा तिरंगा झेंडा हा जगातील सर्वात उंच ठिकाणी फडकवण्याचे स्वप्न उराशी बाळगून अवघ्या २३ वर्षी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकवला, त्या वेळेस सोनम वांग्यांल यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते,त्याच वर्षी भारत आणि अमेरिका यांनी चिनच्या अणुबॉम्ब चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक गुप्त मोहीम सुरू केली होती,चिनच्या अणुबॉम्ब चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी एका उंच ठिकाणी गुप्त ऊपकरण बसवण्याची ही मोहीम होती, सोनम वांग्यांल यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून देशाच्या रक्षणासाठी नंदा देवी नावाचे ऊंच शिखर सर करून ही मोहीम यशस्वी केली होती, लडाखला स्वतंत्र अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या साठी त्या वेळी सोनम वांग्यांल यांच देखील आंदोलन सुरुच होत,सन १९८४ मध्ये खऱ्या अर्थाने या आंदोलनाला सुरुवात झाली होती,सोनम वांग्यांल यांच्या नेतृत्वाखालील त्या वेळेस मोठे जनआंदोलन उभे राहिले होते, त्या वेळी देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी लडाखला जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि आणि त्यातून संवेदनशील मार्ग देखील इंदिरा गांधी यांनी काढला होता,
सोनम वांग्यांल यांनी देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून देखील यशस्वी कामगिरी बजावली होती, पुढे १९९३ मध्ये सोनम वांग्याल हे सेवा निवृत्त झाले आणि पुढिल आयुष्य देखील त्यांनी देशाच्या हितासाठी खर्ची घातले, आणि आज देशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या विराचा मुलगा सोनम वांगचुक देशहितासाठी शिक्षण आणि पर्यावरण सुधारणा करण्यासाठी अहोरात्र लढा दिला जनतेसाठी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उपोषणाला बसला म्हणून त्याला देशद्रोही ठरवुन गजाआड केल जात म्हणजे हा किती भयानक प्रकार आहे,हे संपूर्ण देशवासीयांनी लक्षात घेण गरजेच आहे,
ज्यांनी चिनच्या अणुबॉम्ब चाचणीवर लक्ष ठेवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला त्यांच्याच मुलाला आज चिनचा समर्थक म्हटल जात ही दुर्दैवाची बाब आहे, ज्या वडिलांच्या उपोषण आंदोलनाला इंदिरा गांधी यांनी भेट देऊन संवेदनशीलपणे मार्ग काढला त्यांचाच मुलगा सोनम वांगचुक आज आंदोलन करत असताना नरेंद्र मोदी मात्र, पोलिस दल सैन्यदल तसेच मिडियाचा वापर करून आंदोलन दडपून टाकत आहेत,याचाच अर्थ मोदी सरकार हे लोकशाहीवर नाही तर दडपशाहीवर ऊभे आहे, तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही सरकारचे शत्रू आणि सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर तुम्ही देशद्रोही, म्हजेच हे लोकशाही संपुष्टात येत असल्याच लक्षण आहे,




