बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच भाजपाच लाडक नेतृत्व राम पातकर यांचा आज वाढदिवस,, उत्साहात संपन्न,

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांचा आज जन्मदिवस, बदलापूर शहारामध्ये भारतीय जनता पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळुन शहरातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राम पातकर यांचा सिंहाचा वाटा आहे,पक्षा मध्ये काम करत असताना बदलापूर शहराच्या जडणघडणीत राम पातकर यांच मोठ योगदान आहे, बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना राम पातकर यांनी बदलापूर पुर्व आणि पश्चिम परिसराला जोडण्यासाठी सर्व प्रथम उड्डाणपूलाची निर्मिती केली, त्या मुळे पुर्व पश्चिम प्रवास हा नागरीकांना अधिक सुखकर झाला आहे, शहरातील रस्ते पाणी वीज गटारे स्वच्छता या सर्वच कामांना राम पातकर यांनी विशेष महत्त्व देऊन बदलापूर शहराला महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, बदलापूर शहरातुन विविध ठिकाणी जाणाऱ्या महामार्गांसाठी राम पातकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, महामार्गामध्ये संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी राम पातकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे,

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, रेल्वे प्रवाशांसाठी बदलापूर शहराला अधिक लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात राम पातकर यांच योगदान आहे,तर बदलापूर शहरासाठी रेल्वेची तिसरी चौथी रेल्वे लाईन सुरू करण्यासाठी राम पातकर यांचा यशस्वी प्रयत्न सुरू आहेत, या बाबत त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कडून मान्यता मिळवून त्या साठी लागणाऱ्या निधी साठी देखील यशस्वी प्रयत्न केले आहेत,स्मित हास्य आणि नम्रपणा हा राम पातकर यांचा विशेष स्वभाव गुणधर्म असल्याने त्यांच्या कडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे, स्वपक्षातीलच नाही तर सर्वच पक्षातील नेते त्यांचा नेहमीच आदर सन्मान करत असतात, शहरात राम पातकर यांना नेहमीच आदरपूर्वक “तात्या” ह्या नावाने संबोधले जाते, अशा या मनमोकळ्या आणि गुणवान समाज कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे,लोकपालक मिडिया कडून देखील राम पातकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अनंत शुभेच्छा,




