Uncategorized

बदलापूर! आमदारांच्या निवासस्थानासमोर मुरबाड बस मध्ये बिघाड होऊन बंद, परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

बसेस मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने प्रवासी हैराण

प्रतिनिधी ! रुतिकेश रोकडे
रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५

बदलापूर मुरबाड बस मध्ये आज सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.. आज सकाळी दहाच्या सुमारास बदलापूर गावातील आमदारांच्या निवासस्थानाच्या समोर बदलापूर मुरबाड बस पुन्हा एकदा काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे, बस मध्ये बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना अर्धवट प्रवासातूनच वाट काढावी लागली आहे. यामुळे बराच वेळ वाट बघितल्यानंतर बस मध्ये दुरुस्ती करून बस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे बदलापूर मुरबाड बस मध्ये बिघाड होऊन प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले होते,या परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!