क्राइम
आंबरनाथ मध्ये खाऊच्या पाकिटात गुटख्याच्या पुड्या आढळल्याने खळबळ,,
स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी

शासनाने राज्याभरात गुटख्याच्या विक्रिवर बंदी घातली असली तरी गुटख्याचे व्यापारी मात्र गुटखा विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत, परंतु आंबरनाथ मध्ये एका दुकानात लहान मुलांच्या खाऊच्या पाकिटात चक्क गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या आहेत,
संबंधित व्यक्तीने आंबरनाथ मोतीराम नगर येथील दुकानातून मुलांसाठी पाच ते दहा रुपयांच्या किमतीचे खाऊचे पाकिट विकत घेतले,खाऊचे पाकिट फोडून बघीतले असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला,या बाबत सदर व्यक्तीने थेट दुकानदाराला जाब विचारला असुन दुकानदाराने खाऊच्या पाकिटाची निर्माण करणाऱ्या कंपनीकडे या बाबत विचारणा केली आहे, कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसुन, या बाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे,




